Sunday, April 13, 2008

प्रश्न तत्त्वाचा आहे..

परवा एका मित्राचं पत्र आलं होतं. साहेबांनी फारच मनावर घेउन, पेटून वगैरे लिहीलं होतं. बाकी तपशील जाउद्या, पण स्वत:च्या मनाविरुद्ध घरात काही धार्मिक कर्मकांड करावं लागल्यामुळे झालेली चिडचीड पत्रात अगदी पुरेपूर दिसत होती. आणि एक पराभव आणि अपमान झाल्याचा सूरही.

आपल्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करावी लागणं यातून होणारा त्रास कधी ना कधी सगळ्यांना अनुभवावा लागतो. त्यातून जर "प्रश्न तत्त्वाचा" असेल तर मग विचारायलाच नको! म्हणजे या मित्राच्या बाबतीत, कर्मकांडांना त्याचा तत्त्वत: विरोध असूनही केवळ घरच्या बाकीचांच्या आग्रहावरून त्याला माघार घ्यावी लागली हे तर स्पष्ट आहे. पण मग त्याची पराभूत मन:स्थिती, राग आणि अपमान कितपत समर्थनीय आहे हे मला कळेना. आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्‍ती, कुटूंबीय यांच्या साठी आपल्या तत्त्वांना मुरड घालावी लागणे हा पराभव समजावा का?

आणि त्याहीपलिकडे हा पराभव आपला आहे की तत्त्वाचा? मुळात इतका अपमान होण्याइतके आपण मोठे आहोत का? असू, तर मग ज्यांकडून आपला पराभव झाला (असं आपल्याला वाटंतय्) ते आपल्याहीपेक्षा आणि आपल्या "तत्त्वा"पेक्षा मोठे असणार नं? आणि नसू, तर असं धुसफुसत रहाण्यापेक्षा, आपल्याला अजून बरंच मोठं व्हायचं आहे असं समजावं का?

केवळ तत्त्वासाठी मैत्र्या, नाती तुटलेली आपण बघतोच की. पण नात्यांसाठी तत्त्वांना मु्रड घातलेलीही बघतो. मग नात्यांमधला कडूपणा स्वीकारून "तत्त्वनिष्ठा" जपणारे आपण की नात्यांचं मोल तत्त्वांपेक्षा वरचढ ठरवणारे आपण? आणि बाकी वेळेला तत्त्वांचा उदो उदो करत फिरणारे जेव्हा नात्यांसाठी तडजोड करतो, तेव्हा दांभिक होतो का आपण? आणि काळाच्या ओघात नात्यांची उलथापालथ होऊ शकते, तशीच तत्त्वं सुद्धा बदलणार नाहीत याची काय हमी?

मित्राची मारे अशाच काही शब्दात समजूत घालून मी मोकळी झाले. पण माझ्यावर अशी वेळ आली की हे प्रश्न भेडसावत रहाणार ही जाणीवही झाली.

शेवटी प्रश्न तत्त्वाचा आहे...

नाही, ज्याच्यात्याच्या तत्त्वाचा आहे!!

14 comments:

a Sane man said...

:)...na sampaNare prashna...koN kiti samjootdarpaNa dakhavato yavar sarva kahi aahe!

कोहम said...

paTala....prashna jyachya tyachya tatvaachaa aahe..

HAREKRISHNAJI said...

Aaha, Finally the silence has been broken. You are right, so many times we hurts otheres and including oueselfs for the Principles.

Kaustubh said...

बरोबर. :)
प्रश्न ज्याच्यात्याच्या तत्त्वाचा आहे.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षीच Maturity वगैरे आलेला माझा मित्र मला नेहमी सांगत असतो.
"अरे चूक किंवा बरोबर असं काही नसतंच. या गोष्टींना फारसा अर्थ नसतोच. ज्याचा त्याचा प्रश्न."
नेहमीच पटत नाही मला, पण कधीतरी पटतंही.
पटणं, न पटणं यालाही फारसा अर्थ नसावा.
:)

Snehal Nagori said...

ha prashna apan mareparyant sampnaar nahi... karan yala uttarch nahi... kadhi manus motha tar kadhi tatwa... ani he apnch tharwaycha.... pan saglyat jasta manastap hoto jevha hech tharawta yet nahi...

Meghana Bhuskute said...

हम्म्म. याला काही उत्तर नाही बहुधा.

hemant_surat said...

प्रश्न हा माझं कोण किती ऎकतय हा असतो. माझंच सगळ्यांनी ऎकावं म्हणून मग आपण तत्वं तयार करतो. मला नाही म्हणू शकाल पण तत्वांना नाही ह्या खुळ्या समजूतीत डुंबून मग आपण त्याचा टेंभा मिरवितो. पण त्याच वेळेस आपण हे विअसरतो की हेच दुसरी व्यक्तीपण करू शकते आणि तेही आपल्यापेक्षा जास्तं सफ़ाईने. किंवा तुमची तत्वं तुम्ही माना मी नाही हा रोखठोक approach घेत धुडकावून लावते तेव्हा आपली तत्वं नाही तर egoच चुरडल्या गेला असतो. आता हे ही कोणाला नाही पटले तर मी माझा ego दुखावून घेणार नाही व प्रश्न तत्वाचा करणार नाही.

शर्मिला said...

मला वाटतं जेव्हां एखादी व्यक्ती काही विचारसरणी किंवा मूल्ये आदर्श मानते, ती आपण मानावी असा विचार करते तेव्हां वैयक्तिकदृष्ट्या ती त्यांच्यासाठी तत्त्वे बनतात. दर वेळी ही तत्त्वे इतकी काही आग्रही किंवा टोकाची असतातच असे नाही की ती मोडली जाऊच नयेत किंवा फार काही महानही नसतात. साधीसुधी असू शकतात. फक्त प्रश्न असा येतो की जर एखादी व्यक्ती त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही त्याच्या दृष्टीने महत्वाच्या तत्त्वाने वागत असेल तर त्याच्या जवळच्या व्यक्तींनी (त्यांच्या स्वत:च्या आयुष्यात जर ह्या तत्त्वांनी काही फारमोठी ढवळाढवळ होणार नसेल, किंवा त्यांच्या स्वत:च्या तत्त्वांशी त्याचे काही clashes उडणार नसतील तर)त्या व्यक्तीची तत्त्वे त्याने मोडून-मुरडून वागावे असा आग्रह कां धरावा? त्यात स्वत:च्या नात्याला-प्रेमाला कां पणाला लावावे? त्याच्या इशू का करावा? वागू द्यावे एखाद्याला त्याच्या त्याच्या तत्त्वाप्रमाणे.
मला स्वत:ला अशी तत्त्वाने चालणारी माणसे फार आवडतात व पटतात. त्याने त्यांचे रोजचे आयुष्य एका काही उंचीवर पोचल्यासारखे असते.
फक्त बरेचदा तत्त्वांचा अतिरेक होतो आणि त्यात इतरांची आयुष्यही खेचली जातात तसे नसावे.
ही गोष्ट वैयक्तिक पातळीवरच ठेवावी.
आता ह्या पोस्टमधल्या धार्मिक कर्मकांड करावं लागल्याने चिडचिड झालेली आहे त्या माणसाची. माझीही होईल. जर प्रत्येक वेळीच मला पटत नसताना घरच्यांनी तसा आग्रह धरला मला त्यात खेचण्याचा तर.
जर वारंवार तत्वांना मुरड घालावी लागली अशी अपेक्षा इतरांकडून होत गेली तर मग एक प्रकारचा हट्टीपणा येत जातो स्वभावात की नाहीच मोडणार मी माझी तत्त्व. तेव्हां जवळच्या व्यक्तिंनी खरंच एखाद्याची तत्त्त्व असतात म्हणून सोडून द्यावे असं मला वाटतं.
जिथे खूपच प्रेमाचा-जिव्हाळ्याचा संबंध येतो तेव्हां अशा व्यक्ती स्वत:हून तत्त्व मोडतात, वाकवतात हे मग मी स्वत: पाहीलय. अनुभवलय.
खूपदा तत्त्वांची खिल्ली उडवण्याचाच प्रकार होतो. तो अर्थात अतिरेकाकडे गेलेल्या तत्त्वांमुळे होतो हेही खरे. तुझे आहे तुजपाशी मधल्या आचार्यांच्या तत्त्वांच्या अतिरेकाची उडवलेली खिल्ली किंवा जसे पूर्वी खादीच वापरणे, देशी मालच वापरणे (ही तत्त्व अनेकांनी आग्रहीपणे उचलून धरली त्याचा स्वातंत्र्य चळवळीला किती फायदा झाला हे न विसरताही असं वाटतं की स्वत: फक्त खादीच वापरीन हे तत्त्व योग्य पण घरातल्य इतरांनीही तसेच करावे हा आग्रह धरणे हा अतिरेकीपणा. अर्थात पूर्वी कुटुंबप्रमुखाची सत्ता असायची त्यामुळे हा आग्रह असायचा. आता तसे होणारच नाही.)
माझ्या एका पर्यावरणप्रेमी मित्राची आणि त्याच्या पत्नीची अशी अनेक तत्त्वे आहेत. ते त्या तत्त्वांनुसार वागतात. आम्ही कित्येकदा ते अडचणीचे ठरुनही त्यांना तसे वागू देतो. कारण तत्त्वाने वागणे प्रत्येकालाच जमत नाही. ज्यांना जमतं त्यांच खरंच कौतुक असतं आणि त्यांना तसं करु द्यावं.

Nandan said...

"I will not die for my opinions/principles. What if they are wrong?" asa kuthetari vachalyacha aaThavata. Vinodacha bhaag sodala tari tyaat thoda tathya aahe asa vaaTata. Tyamule kuthalach tattva tuTeparyant taaNoon dharayacha nahi, ya tattvashi ekaniShTha rahave :)

Priya said...

आणि काळाच्या ओघात नात्यांची उलथापालथ होऊ शकते, तशीच तत्त्वं सुद्धा बदलणार नाहीत याची काय हमी? >>> पटलंच अगदी! शेवटी 'चूक-बरोबर' च्या व्याख्याही परिस्थीतीनुसार बदलतातच ना! :)

छान विचार केलायस! तुझं ते 'विचार-तरंग'चं लेबल लाव की याला... :)

Anand Sarolkar said...

आणि काळाच्या ओघात नात्यांची उलथापालथ होऊ शकते, तशीच तत्त्वं सुद्धा बदलणार नाहीत याची काय हमी? >>> pan kalachya oghat jee badlat nahit tyanach tatva mhantat. kala pramane badaltat tee tatvach nastat.

मोरपीस said...

बरोबर प्रश्न तत्त्वाचा आहे, आपल्या इच्छेविरूध्द एखादी गोष्ट होणे म्हणजे याला आपण "मन मारून जगणे" म्हणतात.

Samved said...

तत्व? हे काय असतं? जगण्याच्या साध्या नियमांना तत्व म्हणायचं? आणि नियमांसाठी जगणं की जगण्यासाठी नियम? गुंता आहे नुस्ता

Kedar Mhaswade said...

जबरदस्त लेख! ३ िमन्टात वाचता येऊन कळणारे लेख लिहीण्याचं कसबच निराळं.

नंदनचे विचारही पटले :).

जाता जाता -- जे खरच तत्वांसाठी जगतात, ते तत्वांमुळे जगतात. तसं जगता न आल्याने उगीच "धुमसत राहणं" हा "option" च त्यांना नसतो.

In a way, it's cold blooded, isn't it?