Monday, December 17, 2007

नाताळ आणि दिवाळी

दुकाना दुकानातून भरगच्च सजावटी आणि ताजा माल. सगळीकडे "साले का मेला" लागलेला. सणासाठी खरेदीची गडबड, गर्दी आणि उत्साह. आपापल्या पर्सा, पिशव्या आणि पोरं सांभाळत "हे घेऊ की ते" या विवंचनेत हिंडणार्‍या ताया, मावश्या, आज्या ... :) पुण्याचा लक्ष्मी रस्ता असूदे, लंडन मधला ऑक्सफर्ड स्ट्रीट नाहीतर सान फ़्रान्सिस्को मधला युनियन स्क्वेअर! सणासुदीला जवळपास असंच चित्र दिसतं! सण कुठला का असेना जगभरात सगळीकडे तोच उत्साह आणतो. घरोघरी तयार होणारे (किंवा तयार आणले जाणारे) खमंग गोड पदार्थ तोच मूड सेट करतात.

भारतात दसरा दिवाळीचा उत्साह ओसरला की इथे नाताळची हवा सुरु झाली. या दिवसात कधीही रस्त्यावर बघितलं तर दर पाच दहा मिनीटाला एखादी तरी गाडी टपावर ख्रिसमसचं झाड आणि पोटात उत्साही पोरं घेऊन जाताना दिसतीये. आपल्या घरातल्या साजर्‍या होणार्‍या सणात निसर्गाला सामावून घ्यायची काय ही हौस! ते बघताना मला थेट दसर्‍याची झेंडूची फुलं, पाडव्याच्या आंब्याच्या डहाळ्या आणि कडूलिंबाचा कोवळा पाला आठवला... म्हणजे आपल्या आणि पाश्चात्य जगात सणोत्सवांमधे खरेदी, गोडधोड पदार्थ आणि सुट्टी यापलिकडे असलेलं हे साम्य आत्तापर्यंत माझ्या तरी लक्षात आलं नव्हतं.

की घराच्या, "आपल्या" संस्कृतीच्या आठवणीनी जीव व्याकुळ होत असताना आपल्याच मनानी हे साम्य शोधून नकळत घातलेली ही समजूत होती कळेना. हे म्हणजे शेजारच्या गोड म्हातारीला "एलायझा आजी" (ट्युलिप, वाचतीये बरं तुझ्या नवीन नोंदी), सहकर्‍याला "जानराव" आणि Fair Oaks Apartment ला "ओकवाडी" म्हणण्यासारखं! आपल्या भोवतालच्या परकेपणात आपलेपण शोधणं काही फार अवघड नाही!

या वर्षी एक miniature का होईना, Christmas Tree आणावं म्हणते!

13 comments:

HAREKRISHNAJI said...

You are right.
Merry Christmas
Enjoy

Meghana Bhuskute said...

पद्मजा फाटक काय म्हणते माहितेय, 'ग्रह तर एकच आहे ना इथून तिथून!'

Anand Sarolkar said...

Kharach...jagachya pathivar kuthe hi jaa..manus sagli kade sarkhach

HAREKRISHNAJI said...

अभिनंदन आजच्या "मराठी बॉग विश्व", चतुरंग , लोकसत्ता मधे आपल्या बॉग बद्द्ल फार चांगले लिहुन आले आहे.

http://www.loksatta.com/

प्रशांत said...

ओकवाडी वरून आठवलं.
इथे Ellendale (एलेंडेल) Place या रस्त्याला मी काही दिवस 'एलेंडले' असं वाचत होतो. [मेहेंदळेसारखं एलेंडले :) ]

Monsieur K said...

navin varshaat ekhaadi navin post nahi aali ajun :(

HAREKRISHNAJI said...

Natal over Diwali over ,Shimga on the way , no आपुला संवाद आपणासी

Sumedha said...

Or perhaps too much आपुला संवाद "आपणासी" ;)

मंदार said...

lihit ka nahiyes 2-3 mahine zale...

Akira said...

Sumedha,

Chaan lihilays...I agree with anand..mansa ithun tithun sarkheech!...

Ani tujha hi mhanana patla - apan parkya thikani swatahachya khuna shodat asto karan tya sapadlya ki apanahi ithe samawu shakto asa vishwas watat asawa mhanun..

मंदार said...

सुमेधा... लिहीत नाहीयेस अजिबात... लिहीत रहा... खरंच शिमगा पण झाला... पाडवा आला आता... लिही काहीतरी छान...

Priya said...

khup dis jhaale.. livhaa ki kaaytaree!

HAREKRISHNAJI said...

When ?????

When will be the blogs start talking ?