किंवा तुम्ही भारतातही असलात तरी एखादं जुनं पुस्तक, नाटक,कवितासंग्रह शोधशोधून सुद्धा मिळत नाही. अप्पा बळवंत चौक पालथा घालून झालेला असतो, बुजूर्ग मित्र-नातेवाईकांच्या पायर्या चढून झालेल्या असतात. त्यांच्याकडून त्या पुस्तकाबद्दल ऐकायला मिळतं पण पुस्तक काही मिळत नाही. विद्यापीठाच्या ग्रंथालयातून नेमकी शेवटची प्रत गहाळ झालेली असते :(
"आत्ता ते पुस्तक online असतं तर..." विचार मनाला शिवून जातो. अगदी याच विचारानी सुरु झालेला प्रकल्प आहे marathipustake.org. तुम्ही भेट दिलीये? नसेल तर जरुर द्या!
मराठीतील जुनी दुर्मिळ पण मौल्यवान पुस्तके digitize करून internet वर मुक्तपणे सर्वांना उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. जी पुस्तकं आता दुकानातून नाहीशी झाली आहेत, ग्रंथालयातूनही कदाचितच उपलब्ध आहेत. ज्या पुस्तकांनी इतिहास घडवला आहे, पण तरी आज फक्त नावंच उरली आहेत. संत वाङमय, जुनी नाटकं, कविता, निबंध. हे सगळं जुनं सोनं पुनर्जीवित करून सर्वांना उपलब्ध करून देणे हा एकच उद्देश. यासाठी लेखाधिकाराच्या कक्षेबाहेरची पुस्तके मिळवून टंकलिखित करणे हे मुख्य काम स्वयंसेवकांच्या प्रयासानी सुरु आहे.
अर्थात हा महत्त्वाकांक्षी दूरदर्शी प्रकल्प दीर्घकाळ चालू ठेवायला आणि यशस्वी करायला गरज आहे मराठी साहित्यप्रेमी स्वयंसेवकांची! California च्या San Francisco Bay Area मधील CalAA (California Arts Association) या संस्थेतर्फे या प्रकल्पास हातभार लावण्यासाठी नुकतेच संघटित प्रयत्न सुरु झाले आहेत. तुम्हाला या प्रकल्पात सामील व्हायला आवडेल?
या प्रकल्पासाठी पुस्तके सुचविणे, शक्य असल्यास ती मिळविणे, मराठी टंकलेखनात भाग घेऊन ती पुस्तके digitize करणे, आणि टंकित झालेल्या पुस्तकांचे मुद्रितशोधन (proof-reading) करणे अशा विविध प्रकारे तुम्ही योगदान देऊ शकता. उदा. सध्या आम्ही "समग्र बालकवी" चे टंकलेखन सुरु केले आहे.
तुम्हाला या प्रकल्पा बद्दल काही प्रश्न असतील, तर मला या ब्लॉगवर प्रतिक्रियेद्वारे संपर्क करा. या प्रकल्पात सामील होण्यासाठी PustaCalAA या google - इ-पत्र गटात सामील व्हा, बाकीच्या सभासदांशी संवाद साधा, आत्तापर्यंत सुचवलेली पुस्तके बघा, अजून पुस्तके सुचवा, ती मिळवून सर्वांपर्यंत पोचवा आणि टंकलेखनाच्या कामात सहभागी व्हा! त्यासाठी तुमच्या प्रतिक्रियेत तुमचा email पत्ता कळवा (मी तो प्रसिद्ध करणार नाही!). किंवा तुमचा google ID वापरून या गटाच्या सभासदत्त्वाचा अर्ज करा!
तुमच्या उत्साही प्रतिसादाची वाट बघते :)