Friday, May 05, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

ट्युलिपनं मला या विषयावर लिहायला टॅग केलं तेव्हा खूप आनंद झाला. आणि थोडीशी ओशाळून पण गेले. कारण मी काही खूप पुस्तकं "खाणारी" नाही. शिवाय भारत सोडल्यापासून मराठी वाचन कमी झालंय हेही खरंच. अगदी वर्षाकाठी घरी गेलं की विकत घेतलेली आणि भेट मिळालेली पुस्तकंसुद्धा सगळी नाही वाचून होत. तरी देखील कपाटात असलेली पुस्तकं कायम खुणावत असतात हे खरंच. शिवाय शाळेत असल्यापासून काही वाचलेलं, काही वेचलेलं आहेच की! तर माझ्या पुस्तक गाठोडीतलं काही...

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक :
स्वत:विषयी : अनिल अवचट

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती :
"स्वत:विषयी" म्हणजे अगदी सहज मोकळ्या, ओघवत्या भाषेत केलेलं स्वानुभवांचं प्रांजळ कथन. त्याच्या साधेपणात त्याचं सौंदर्य आहे. इतका मोठ खटाटोप मांडणारा माणूस किती साधा असू शकतो यानी अचंबित झाले मी हे पुस्तक वाचल्यावर. आणि लक्षात राहिली अर्पणपत्रिका - "सुनंदा, हे पुस्तक अर्पण करण्यासाठी तुला काही काळ माझ्यातून बाहेर काढावं लागतंय, त्याबद्दल थोडी रुखरुख."

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके :
आनंदी गोपाळ : श्री. ज. जोशी
स्वामी : रणजीत देसाई
पाडस : राम पटवर्धन
समीधा : साधना आमटे
बोलगाणी : मंगेश पाडगावकर

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके :
स्मृतिचित्रे : लक्ष्मीबाई टिळक
माझी जन्मठेप : वि. दा. सावरकर
आई : मॅक्सिम गॉर्की
टॉलस्टॉय एक माणूस : सुमती देवस्थळी
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी : प्रतिभा रानडे

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे :
निर्विवादपणे, "असा मी असामी", अतिशय प्रिय पुस्तक. चार मित्र मैत्रिणी जमले की अगदी नकळत या पुस्तकातील कुठली तरी कोटी निघतेच निघते. इतकं पु. लं. नी आमच्या तुमच्या सारख्या सगळ्या "असामींना" त्यात सामावून घेतलेलं. कुठलंही पान उघडून वाचावं... खरं म्हणजे पारायणं करून आता इतकं पाठ झालंय की पुस्तक उघडायचीही गरज नाही. पण तरीही उघडलं तरी हजाराव्यांदा वाचताना सुद्धा ओठावर स्मित फुटावं म्हणजे काय जादू आहे!

आता या सहब्लॉगर्सना tag करते ('खो' देते म्हणायचा मोह होतोय :-) )
दीपा
कौस्तुभ
विदग्ध
यतीन

7 comments:

Parag said...

I think paadas is translated by Ram Patwardhan, not Ram Shevalkar.
Saw your to be read list. Tolstoy varil pustakachaa ullekh paahilaa aani sahaj aathavle - a beautiful book on Chekhov by Vijay Padalkar : kavadase pakadanaara kalaavant.

Priyabhashini said...

चांगली पुस्तक वाचणारी माणसंही चांगली असतात असा माझा भाबडा समज आहे. इथे आल्यापासून अगदी खरा ठरतोय. खूप छान निवड केलीस.

Fleiger said...

म्राठी माणूस म्हटला की त्याच्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत पुलंचे नाव कुठेतरी असणारच. मी पण येताना ४ पुस्तके घेऊन आलोय, आणि घरची आठवण आल्यास ती मदतीला असतात.

Sumedha said...

पराग, धन्यवाद. चूक दुरुस्त केली आहे.

Anonymous said...

सुमेधा,

अनिल अवचटांच्या पुस्तकाबद्दल केवळ ऐकले होते. तुमची नोंद वाचल्यावर एकदा तरी या पुस्तकाचे पारायण करायचेच हा निश्चय केलाय. मला खो दिल्याबद्दल धन्यवाद, बरं का :)!

Mints! said...

सुमेधा, मी पण 'स्वत:विषयी' नुकतेच वाचले. अतिशय सुंदर पुस्तक आहे.
सुन्दर लिहिले आहेस. पुस्तकांची निवड चान आहे.

Aniruddha G. Kulkarni said...

Sorry for unsolicited comments. I reached here when I was doing some search.

I hope you have read M V Dhond's review of "Swami".

I too once liked the book-few decades ago.

Now, I think it is sentimental, unhistorical trash. As bad as the Marathi serials you get on TV these days.

Please also read Dhond'd review of "Anandi Gopal". Although here I feel the book is OK.

I book you wish to read are pretty good. Particularly Pratibha Ranade's book is one of the best ever in Marathi. And so are Tilak's and Deshpande's.

Also read Padalkar's book alright. But read Chekov if you have not read him so far.