Tuesday, March 14, 2006

देखो मगर प्यार से!

गाडी चालवताना माझं लक्ष बर्‍याच वेळा समोरच्या गाडीच्या लायसन्स् प्लेट कडे जातं. काल सकाळी signal ला थांबले असताना एक लायसन्स् प्लेट बघितली "ANIM8AR", अर्थात "animator". इथे अशा प्लेटस् बर्‍याच वेळा बघायला मिळतात. मला कौतुक वाटतं त्या लोकांच्या कल्पकतेचं! "YFS CAR", "DON N4C", "ML8 ML8" या अजून काही लक्षात राहीलेल्या गंमतशीर पाट्या. google वर search मारला तर कदाचित मोठी यादी मिळेल.

"ANIM8AR" बघून या पाट्यांची आठवण झाली आणि एकदम भारतातल्या ट्रकच्या मागे लिहीलेली काहीच्या काही घोषवाक्यं आठवून खूप हसू आलं. अगदी "आई-वडीलांचा आशीर्वाद", "साई-कृपा" किंवा "जय भोलेनाथ" पासून "देखो मगर प्यार से", "चल मेरी धन्नो" किंवा "जंगल की रानी" पर्यंत आणि कुटुंबनियोजनाच्या घोषणांपासून ते वनसंवर्धनाच्या ब्रीदांपर्यंत काय वाट्टेल ते. तेही लिहीणार्‍यांच्या कल्पकतेचं कौतुक आहे न? आणि हे सगळं "Horn OK Please" (मधोमध कमळाचं चित्र!) याच्या अवती भवती विखुरलेलं, एक एक शब्द लावून वाक्‍य पूर्ण करायचं म्हणजे कसरत!

हे सगळं आठवून हसू आवरेना. ऑफिसच्या दारात एरिक (सहयोगी) दिसला.
"कशाला हसतीयेस इतकं?" त्यानं विचारलं.
"देखो मगर प्यारसे" अस्मादिक!
"Oh is that 'good morning' in Indian?"
"Yes", म्हणलं जरा फिरकी घ्यावी त्याची! त्याला मग "देखो मगर प्यारसे" म्हणायला शिकवलं. म्हणलं तुला कुणी Indian मुलगी पटवायची असेल तर उपयोग होईल. पठ्ठ्याची चिकाटी पण इतकी की दिवसभर घोकत होता!

आणि आज सकाळी आल्या आल्या "देखो मगर प्यारसे सुमेधा"!! आता थोडे दिवस रोज सकाळची करमणूक होणार आहे ही :-)

10 comments:

Nandan said...

लेख वाचताना मजा आली. अशाच स्वरुपाचे पंजाबी ट्रक्सच्या मागे आढळणारे encoding म्हणजे - (हृदयाचे चित्र) २० १३, ८० २० १३ ( = दिल वी तेरा, अस्सी वी तेरे). :-) शिवाय दादरमधे एकदा 'मराठी माणूस' हे पाठीवर मिरवणारी टॅक्सी पाहिली होती.

Y3 said...

good observation.
खरच, आपल्या भारतातल्या ट्रकच्या मागे लिहिलेल वाच ल की त्या लोकांच्या कल्पकतेची दाद द्यावीशी वाटते कधी कधी.
मागे भारतात गेलो असतांना मी असच एका ट्रकवर वाचल होत.."१३ मेरा ७"

Priyabhashini said...

सुरेखच...ट्रकच्या मागे आढळणारी आणि मला आवडणारी पाटी म्हणजे "बुरी नजरवाले तेरा मुंह काला", उगीचच एखाद्याला चिडवायला छान वाटते.

P said...

आई अण्णाचा आशिर्वाद ,दादांची क्रुपा हे तर अगदी typical:))) गंमत असते वाचण्यात.

Fleiger said...

"बूरी नजर वालें..." "आई तुझा आशिर्वाद" वगैरे असतातच... पण मला सगळ्यात लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे एका टमटमच्या (six seater) मागे लावलेले ६ tristars (mercedes च्या bonnet वर असतात तसे) आणि driver च्या समोर लटकवलेल्या CDs.

Obliv[+]ion said...

Behind a Calcutta bus during the Indira Gandhi 10-point Program:
THE NATION IS ON THE MOVE
KEEP SAFE DISTANCE

My all-time favorite on an Illinois license plate:
I STILL MISS MY EX
BUT MY AIM IS GETTING BETTER

Obliv[+]ion said...

Oh, I was forgetting this obviously desi belligerent license plate on an SUV:

4DUNGA

Sumedha said...

मी "बुरी नजर वाले.." कशी काय विसरले? ते तर सगळ्यात उच्च!

Fleiger said...

त्याचाच मराठी अवतार पाहिला होता एकदा... "पहा पन प्रेमाणे"

Kaustubh said...

तुझ्या या लेखाची मला आजिबात कल्पना नव्हती. हा लेख वाचून आता मी पोटधरुन हसतोय. १०-१२ दिवसांच्या अवधीत एकाच विषयावर २ लेख लिहिले जावेत यासारखी दुसरी गंमत नाही.
By the way HORN OK PLEASE मधला OK नक्की कशासाठी असतो? तुला या प्रश्नाची उकल झाल्यास मला जरूर सांग.

टाटा. फिर मिलेंगे.