Monday, October 23, 2006

खरेच का हे!

परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारताना अनिलांच्या या कवितेची आठवण निघाली. तिला नक्की शब्द आठवत नव्हते, आणि मला कुठेतरी लिहून ठेवलेली आठवत होती. म्हणून ही नोंद! त्या निमित्तानं, ही कविता प्रेमकविता आहे की भक्‍तिकविता किंवा विराणी असावी, अशी चर्चा झालेली आठवली...

तुझ्या पथावर तुझ्या पदांच्या
पायखुणांच्या शेजारी मम
पायखुणा या उमटत जाती
खरेच का हे?

मातीमधल्या मुशाफिरीतून
हात तुझा तो ईश्वरतेचा
चुरतो माझ्या मलीन हाती
खरेच का हे?

खरेच का हे बरेही का हे
दोन जगांचे तोडून कुंपण
गंधक तेज़ाबासम आपण
जळू पहावे?

आणि भयानक दहन टाळण्या
जवळपणातही दूर राहुनी
स्फोटाच्या या सरहद्दीवर
सदा रहावे?

-कुसुमाग्रज 

2 comments:

Gayatri said...

:) वा. मग चर्चेचं फलित काय? मला तरी ही विराणी वाटत नाहीये. पण भक्तिकविता आणि प्रेमकविता..दोन्हीही आहे नं? (गज़लेचा गुणधर्म!) :)

बरं, तो तिसऱ्या कडव्यातला शब्द 'तेज़ाबासम' हवा ना?

Sumedha said...

चर्चेचं काही फलित झालं तर मग ती कसली चर्चा ;-)

typo बरोबर टिपलास, दुरुस्त केला आहे!