बर्याच वर्षांपूर्वी कोणीतरी हायकू या प्रकाराची ओळख करून देताना हे ऐकवलं होतं :
देवळातल्या घंटेचा
आवाज दूरवर लोपला
रस्ता तिथेच संपला!
काही दिवसांपूर्वी ते असंच आठवलं आणि काही केल्या डोक्यातून जाईना. मागच्या आठवड्यात संवेदनी काव्यमय खो खो सुरु केला. आज सागरनी माझ्या कवितेवर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची कल्पना सुचली.
तर नियम :
१) वर दिलेल्या हायकू प्रमाणे दोन किंवा तीनच ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम, शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सुचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्त होणार्या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त ३ जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास माझ्या ब्लॉगवर मला कळवायचं. मला कळवायचा हेतू इतकाच की मी सगळ्या कड्या एकत्र करू शकीन.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगची link द्या.
आता माझी कडी:
रस्त्यातल्या फुलांचा
धुंद गंध दरवळला
मुक्काम तिथेच हरवला!
आणि माझा खो संवेद, सागर आणि चक्रपाणिला.
ता. क. : सईनी हायकूवर एक छान नोंद मांडली आहे!
Thursday, August 28, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
15 comments:
jabri kalpana ahe! :)
छान कल्पना आहे. सहभागी व्हायला आवडेल.
रंगा नाही गंध यायला लागला ...
पाण्यामध्येही आसमंत जिवंत व्हायला लागला...
नको तिथे नको तेव्हा तुझाच आठव आला
रागात अनुराग मिसळला.....
हायकू हीच संकल्पना मुळात किती गोड आहे नाही?
Are bap re...asa pan aahe ka! jamawato..
jamanar aahech...jamelach bahuda :)
मला वाटते हायकू ३ ओळींचा असतो (निदान मी वाचलेले तरी) मला वाटते की आपण दोन किंवा तीन ओळींच्या ’फ़ॉर्म फ़ॅक्टर’ वर एकमत होऊन खो-खो पुढे चालू ठेवूया.तीन ओळींचा फ़ॉर्म ठीक वाटतो. अर्थात, ही एक सूचनाच आहे; नियम नक्कीच नाही.
कल्पना छानच आहे आणि विषयही. मी नक्की सहभागी होणार आणि कोणालातरी खो देणार :)
जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
साखळी हायकूत चक्रपाणिकडून खॊ मिळाल्यावर मी सहभागी झालो: href="http://pumanohar.blogspot.com/2008/09/blog-post_12.html
माझा हायकू:
कोमेजलेली फुलं
गंध तसाच कायम तरी
तुझ्या अथांग प्रेमापरी
सुमेधा,आशाने मला खो दिल्यावर माझ्या blog वर हायकू साखळी जोडली आहे..खो कुणाला व कसा देऊ, ते मात्र मला समजत नाहीये..जसे पुढे सरकेल, तसे लक्षात येईल..सुषमा
सुमेधा,
प्रशांत नी मला खो दिलाय. त्यानीच सांगितल्या प्रमाणे तुला पाठवतेय.
हायकूच्या या साखळीतली माझी कडी:
जुनं पुस्तक उघडतांच
पडला एक वाळका गुलाब
आता त्या सारखाच प्रेमांत उरला नाही आब
माझा खो मेघनाला अन् सुषमाला
2:19 PM
आशा ने मला खो दिला, मी चैताली ला देते.....माझी कडी...
छाती वरती डोकं टेकताना
तलम झब्बयाचा स्पर्श घेताना
माळलेला गुलाब काय तुलाच धुंद करत होता? वेडा!
सुमेधा,
साखळी हायकूची कल्पना सुंदर आहे. मला अकिराने खो दिला होता. माझी कडी,
दाटल्या सयी
किरणांचा पहारा
भिरभिरला
शैलेश
Oops...I can just say sorry :(
तू हवं तर अजून काही तरी लिहायला सांग पण हा प्रकार नाही जमतय...हे म्हणजे एका शिंप्याकडून शर्ट अन दुसरया कडून त्यासाठी कॉलर शिवून घ्यायची असं वाटतय. नाहीच जमलं..sorry
http://jayavi.wordpress.com/2008/10/01/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%96%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80/
सुमेधा..... तुझ्या हायकूच्या साखळीत हा माझा हायकू....
Post a Comment