संवेदनी सुरु केलेला खो-खो क्षिप्रा कडून माझ्यापर्यंत पोचला!
संवेदचे नियम इथे परत देते:
१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही
५. अजून नियम नाहीत :)
जोगीण
साद घालशील तेव्हाच येईन
जितकं मागशील तितकंच देईन
दिल्यानंतर देहावेगळ्या
सावलीसारखी निघून जाईन!
तुझा मुकुट मागणार नाही
सभेत नातं सांगणार नाही
माझ्यामधल्या तुझेपणात
जोगीण बनून जगत राहीन!
- कुसुमाग्रज
तुझ्या एका हाकेसाठी
तुझ्या एका हाकेसाठी,
किती बघावी रे वाट,
माझी अधिरता मोठी
तुझे मौन ही अफाट!
तुझ्या एका हाकेसाठी,
उभी कधीची दारात,
तुझी चाहूलही नाही
होते माझीच वरात!
आले दिशा ओलांडून,
दिली सोडून रहाटी
दंगा दारात हा माझा,
तुझ्या एका हाकेसाठी!
तुझ्या एका हाकेसाठी,
साद मीच का घालावी?
सात सुरांची आरास,
मीच मांडून मोडावी!
- यशवंत देव
माझा खो प्रिया आणि सारिकाला!
Sunday, August 24, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
दोन्ही कविता फारच सुंदर आहेत.इथे पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद.
जोगीण मला का आठवली नाही ह्याचं आता वाईट वाटतयं. दोन्ही मस्त.
"Jogin" kavita mast ahe! ya adhi kuthe vachli navti, thanks :)
'आवडती कविता’ म्हटल्या म्हटल्या आपल्या दोघींनाही आधी कुसुमाग्रज आठवावेत हा निव्वळ योगायोग समजावा की Great minds think alike असं काही? :-) खो घेतला आहे! :)
"तुझ्या एका हाकेसाठी" फक्त फेणाणींच्या आवाजात ऎकलं होतं. आज पुर्ण वाचायला मिळालं. धन्यवाद!
Post a Comment