Saturday, March 10, 2007

काळ काम वेग

परवा सकाळी कामाला जाताना ट्रॅफिक सिग्नल पाशी थांबले होते. शेजारच्या गाडीकडे लक्ष गेले. शेजारच्या गाडीतले काका (खरं म्हणजे चांगला तरुण माणूस होता, पण सगळे अनोळखी लोक काका किंवा काकू असतात) "बिनपाण्याने" हजामत करत होते, स्वत:चीच हो! मला हसू आवरेना. नेमकं तेव्हाच त्यांचं पण लक्ष माझ्याकडे वळलं. मला जरा ओशाळल्यासारखं झालं, पण त्यांनी खांदे उडवत मोकळेपणानं हसत माझं लक्ष समोरच्या हिरव्या झालेल्या दिव्याकडे वेधलं! वेळेशी रोजच सकाळी उठून लढाई करणार्‍यांना हे काही नवीन नाही, काय? कामाच्या वाटेवर गाडीत बसून ब्रेकफास्ट करणारे, टाय बांधणारे, केस नीटनेटके करणारे काका आणि मेकप करणार्‍या काक्वा सर्रास दिसतात की!

ते काका घरी वेळ झाला नाही म्हणून गाडीत दाढी करत असावेत का? की त्यांनी तशी सवयच लावून घेतली असेल, वेळ वाचवण्यासाठी? मला "चीपर बाय द डझन" ची आठवण झाली. त्यातील डॅड मुलांना आंघोळीच्या वेळी कॅसेटस् ऐकायला लावून कमीत कमी वेळात नवीन भाषा शिकवत असत. इतकेच नाही रोज करायच्या प्रत्येक कामात कसा वेळ वाचवता येईल, एकाच वेळी दोन किंवा तीन कामे कशी करता येतील, त्यातून नवीन काही कसे शिकता येईल याचा रात्रंदिवस विचार ते करत आणि अमलात पण आणत.

माझ्या एका मित्राची यावरची प्रतिक्रिया म्हणजे "ह्यॅ, यात काय अर्थय? सारखा आपला डोक्याला भुंगा! आपल्याला नाही बुवा जमणार, आपण कसं एकदम मजेत आरामात करतो सगळं, no tension!" त्याला म्हणलं, "dude, you missed the point!" म्हणजे वेळेची गरज म्हणून अशी कसरत करणं वेगळं. पण असं एका वेळी 2-2, 3-3, किंवा 4-4 गोष्टी करून जो वेळ वाचवल्याचा, आपली कार्यक्षमता वाढवल्याचा आनंद असतो तो तुला नाही कळायचा!

एक मात्र खरं, ही गोष्टच अशी आहे की ती रक्‍तात असावी लागते, शिकणं फार अवघड. ती एक कला आहे. आणि हे नुसतं वेळ वाचवण्याबाबत नाही बरंका, सगळ्याच गोष्टींच्या नियोजनाबद्दल. सकाळी उठल्यापासून माझ्या डोक्यात हा "भुंगा" चालू असतो म्हणा न. अमुक एक गोष्ट केली की तमुक गोष्ट करायची, हे झाल्याशिवाय ते होउ शकणार नाही, हे करत असतानाच ते पण उरकून घेता येईल, समजा हे जमलं नाही तर निदान ते तरी होईल, एक ना दोन!

हे लिहीता लिहीता एक मात्र लक्षात आलं, मी मेकप करत नाही आणि दाढी पण ;) म्हणजे आता गाडी चालवताना करायला काहीतरी शोधून काढलं पाहिजे!

9 comments:

Tulip said...

haha.. mast lihil ahes sumedha. agadi patal. mala ahe ashi khod eka veli satra kaam urkayala baghayachi. eka kam karayala ghetal ki bakichi pan athavatat ani ti tyach veli karayacha utsah yeto. ata hyat 'ek na dhad bharabhar chindhya' ashi gat hote khari pan apan tyala multitasking asa nav dyayach asat:P. he hi khar ki jar kadhi chukun sagli kaam ekachveli nit keli geli tar tu mhantes tasa 'karyapurti' cha achat anand milato.
cheaper by the dozn. madhalya tya dishes visalychya techniq ne tar mi agdi impressd jhale hote. ajun hote tya pustaktlya ekek goshtini.

Priyabhashini said...

One of my friends often points at American women who ornately apply their mascara and lip colors at every traffic light.

I personally think it saves your time and also you can reach office up-to-date.

Nice post! :)

Anonymous said...

आंघोळीच्या वेळी कॅसेटस् ऐकायला लावून कमीत कमी वेळात नवीन भाषा शिकवत असत.

अकल्पनीय!

एक मात्र खरं, ही गोष्टच अशी आहे की ती रक्‍तात असावी लागते, शिकणं फार अवघड.

शंभर टक्के सहमत, :)

लेख छान आहे.

Monsieur K said...

i was reminded of Govinda from Hero No 1, where he gets ready (incl brushing his teeth, et al) on his way to office, in the car itself! only to forget that he's wearing the towel while he enters the office :D

i still cant believe tht one can actually shave in the car! i am really bad when it comes to multi-tasking. driving kartaana, shaving tar khup duur chi goshta jhaali - mee tar phone suddha uchalat naahi mostly. i use the excuse of safety, but i know ki asla multi-tasking jhepnaar naahi.

i agree with ur friend - "saglaa aaraamaat karaaycha" :D

kharach, ekdam mast aani halka-phulka post aahe. majaa aali vaachun :)

Deepa said...

सुमेधा, मस्त आहे लेख!

KedarsThoughtsWork said...

ह ह पु वा

पण काय गं, या लेखाचा नायक त्याच्या कानामागे काही "नील-दंत" नामक तंत्राचं यंत्र तर वापरत नव्हता ना? अशा लोकांना पािहलं की कधीकधी मला "हा बरोबर की मी" अशी शंका येते :) कारण सतत काही हातवारे करीत ही मंडळी िहंडताना दिसतात. काही वेळाने त्यांची "कर्ण-कुंडलं" दिसतात नी उलगडा होतो!

Anonymous said...

try listening to 'recorded books' while driving - you can find a bunch of them at library. I love it.

wonderful blog !

-Aparna

Akira said...

Sumedha,

Chaan lihile ahes :) ...karyakshamata wadhawanyaat ananda miloo shakato ha vichar patla..

Driving kartanna gaani tayar karta yetil..(mitramndalinchi mahifil jamlyawar sadar karayla :))

Parag Vasekar said...

Recently Gaditlya CD playerne mi ek lekhak akkha 'eikun' kadhala! phakt gaani eikanyapeksha cdplayercha asa upyog mala awadala.