Thursday, March 15, 2007

क्रिकेट क्रिकेट

आत्तापर्यंत माझ्या इ-मेल मध्ये पाच वेळा आलेली ही ad तुम्ही नक्कीच बघितली असेल :

http://youtube.com/watch?v=kf9tKOexxkw

क्रिकेट विश्वचषकामुळे तमाम भारतीय (तमाम 'भारतीय क्रिकेटप्रेमी' म्हणणार होते, पण ती द्विरुक्‍तीच होईल ना!) चांगलेच "पेटलेले" आहेत. Nike वाल्यांनी अगदी बरोबर नस पकडून तयार केलीये ही ad!भारतात क्रिकेट इतका लोकप्रिय का असावा याची कारणमीमांसा काही मी नको द्यायला. लहानपणी गल्लीत क्रिकेट न खेळलेला मुलगा (क्वचित मुलगी सुद्धा) भेटणं अवघड. टी.व्ही. वर दिवस न् दिवस सामने बघणारे वीर (अर्थात वीरांगना सुद्धा) घरोघरी. दुसर्‍या दिवशी वार्षिक परीक्षा सुरु होत असून सुद्धा दिवसभर बोलणी खात बघितलेली मॅच मलासुद्धा अजून आठवतीये तर कट्टर क्रिकेट भक्‍तांची बातच नको! सुट्टीमधे सगळी भावंडं जमल्यावर क्रिकेटचे सामने हमखास रंगणारच. त्यात मुलगी असल्याने (मग ती आठ-दहा भावांमधली एकुलती लाडकी बहीण असली म्हणून काय झालं), क्रिकेट मधे कायम लिंबूटिंबू. आणि काय खेळ तरी मांडलेला असायचा, दोन बाजूची जांभळाची झाडं म्हणजे boundary, बाजूच्या आंब्याच्या झाडावर बसणार अंपायर आणि घराच्या दगडी भिंतीवर खडुने रंगवलेल्या यष्ट्या. म्हणजे बॉलवर त्या खडुच्या उठणार्‍या छप्प्यानी ठरवायचे आउट आहे की नाही! असा सगळाच आनंद!

पुढे शिक्षणासाठी देश सोडल्यावर हे वेड थोडं कमी झालं. नाही म्हणायला cricketinfo.com नवीन नवीन सुरु झाली होती तेव्हा अगदी ball-by-ball सामने "बघितल्याचे" आठवतायत. पण मग हळू हळू ते पण कमी झालं. या Nike च्या जाहिरातीनं सगळं पुन्हा उजळून निघालं, "Eat cricket, sleep cricket, drink only Coca Cola" आठवलं. त्यातून विश्वचषकाचा माहोल. म्हणजे "rekindling old flame" का काय म्हणतात न, तसं झालं. आज बराच वेळ क्रिकेटच्या websites पालथ्या घालण्यात गेला, "Receive alerts on your desktop" ला sign-up केलं आणि Nike ची ad तमाम दोस्त वर्गाला पाठवली, तेव्हा कुठे जरा मोकळं वाटलं!

आता इतकं करून भारतीय संघाला काही स्फुरण येवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना :)

6 comments:

Monsieur K said...

Sumedha,

mast lihila aahes ekdam!
majhyaa pan cricket aani world cup chya aathvani dolyan samor ubhyaa raahilyaa!

1996 WC madhe aapan banglore la pakistan la haravlyaa mule 12vi physics chya paper karta major confidence boost milaalela :)

tasach 2003 WC final madhe australia kadun harlyaa var phaar jaasti depress jhaalelo.

aso! hyaa veles aapan nakki jinknaar aahot. sachin chaa shevatcha chance aahe, i am sure he'll not give up this time.

Sumedha said...

केतन, तु्झ्या आशावादाची दाद द्यायला पाहिजे! आज बांग्लदेशची मॅच बघून मी फार निराशा करून न घ्यायचा प्रयत्न करतीये. ह्यॅ...

KedarsThoughtsWork said...

क्रिकेटचं वेड अाणि भारत संघ या गोष्टी वेगळ्या ठेवल्या नाहीत तर फार मनस्ताप होतो याचा पुन:पुन्हा अनुभव घेतल्याने जरा काळानुरुप येणारं शहाणपण आलंय.

"नाय्की" ची जाहिरातबाजी अफलातून.

Monsieur K said...

am terribly depressed & disappointed after y'day's match. still not able to get over it.
but s'where in my mind, hope remains afloat. am hoping that these guys pull up their socks, and get the cup home.
"buck up india! it aint over till its over!"
- that's my orkut display name! :)

प्रिया said...

खि खि खि.... मला पण लहानपणी भावांबरोबर खेळलेल्या क्रिकेटची आठवण झाली. 'एक टप्पा आऊट' वगैरे अशक्य नियम असायचे! :D आणि मी पण कच्चं लिंबू म्हणून माझ्यासाठी - तीनदा आऊट झालं की आऊट - असे आणिक स्पेशल नियम! :D

बांगलादेशची मॅच पाहून मलाही खूप नैराश्य आलंय. आपली पाकिस्तानसारखी फजिती होऊ नये! :( आता बर्म्युडाविरूद्धची मॅच फॉलो करतीये.... So far so good!

Monsieur K said...

ajun ek aathvan mhanje, there was this wiry little kid in our neighbourhood who was limbu-timbu - first ball la out vhaaychaa to. but, we wud call him e'day coz he had an entire cricket kit - especially stumps. to nasla, ki stumps chya aivaji paaT vaaparaaycho as stumps. :))))

sadhya, ithe Florida madhe aamhi weekend la cricket khelto. u should have seen the look on the faces of airport security chaps when i was getting the stumps n bats thru customs & security.

anyways, we had a handsome victory over Bermuda. am hoping, we win against SL on Friday. from there on, it will be a totally new ball game in the Super 8s!

cheers to the Men in Blue!