Monday, November 27, 2006

पर्याय आणि निवडस्वातंत्र्य

ऑफिसच्या कॅंटीनच्या मेनूसमोर उभं राहून माझी एक सहकारी तक्रारीच्या सुरात म्हणाली, "हे काय, काही सुद्धा खावंसं वाटत नाही, याला हे लोक भरगच्च मेनू म्हणतात? काही choiceच नाही!" मेनूवर साताठ वेगवेगळे "पर्याय" असूनसुद्धा.

पर्याय ही मोठी मजेशीर गोष्ट आहे. भरगच्च पर्याय हे पुरेशा निवडस्वातंत्र्याचं निदर्शक आहे का? आपल्याला हवा असलेला नेमका पर्याय त्यात नसेल तर? जेव्हा आपण "सगळ्या पर्यायांचा नीट विचार करून मोकळ्या मनानी निवड करता आली पाहिजे" असं म्हणतो तेव्हा कुठेतरी आपल्याला मनापासून हवा असलेला पर्याय उपलब्ध आहे असं आपण गृहित धरलेलं असतं का? तसं नसेल तर मग कसा घेणार मोकळ्या मनानी निर्णय? कारण दिलेल्या पर्यायांची मर्यादा त्यावर आधीच पडलेली असते.

खर्‍या मोकळ्या मनानी तुम्ही निर्णय घेणार असाल तर तुम्हाला स्वत: पर्याय निर्माण करायचं, कमीत कमी धुंडाळायचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य हवं. निवडीचं स्वातंत्र्य हे उपलब्ध पर्यायांच्या पलिकडे जायला हवं. किंवा काही बहुपर्यायी प्रश्नांना कसा पाचवा पर्याय असतो न, "वरीलपैकी काहीही नाही", तसा कायम एक पाचवा पर्याय असावा! पण मग "वरीलपैकी काहीही नाही" हा पर्याय बाकीच्या सगळ्या पर्यायांना निरर्थक करतो. शिवाय "वरीलपैकी काहीही" नसलेलं म्हणजे काय हे नक्की माहीत असेल तर तो पाचवा पर्याय निवडण्यात अर्थ आहे न?

"हो ना, काही choiceच नाही" असं म्हणत आमचा घोळका ऑफिससमोरच्या रेस्टॉरंट कडे वळला, हे सांगणे नलगे! संध्याकाळी घरी आले आणि मेघना पेठेंचं "आंधळ्याच्या गायी" समोर दिसलं!

"
घटना घडतात.
पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात.
घडायचं ते घडून जातं...
पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले..
तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे...
क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्त्वाचे...
त्यातला एकच निवडता येणार असतो,
आणि निवडावा तर लागणारच असतो!
पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी...
माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे.
यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो!
जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही,
अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात
सोडाव्या लागणार्‍या या आंधळ्याच्या गायी...
त्यांना म्हणे देव राखतो...!
आणि आंधळा?
तो तर फक्‍त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत राहतो.
"

14 comments:

Anand Sarolkar said...

Life is all about choices! And of cource choices are followed by the consequences.

Priyabhashini said...

kharay.. lekh aawadala. sahaj aahe.

Raina said...

वरीलपैकी काहीही नाही-- agdi, agdi kharay.

Vishal K said...

लेख थोडक्यात बरंच काही सांगून जातो. आवडला.

Sumedha said...

धन्यवाद मित्रांनो!

Monsieur K said...

Life is indeed all about choices - choices determined by our preferences, and governed by the constraints we face.
On a lighter note, GRE/CAT madhe pan asach "none of the above" option asta, tar probably I would have used that the most! :D

Chhaan lihila aahes :)

swapnatalya Kalyano said...

ekdam chaan lihites buoa tu!

Anonymous said...

Good article!

Dhananjay

Kaustubh said...

सुंदर!

Prasad Chaphekar said...

पर्यायाला पर्याय नाही हे खरं! तसाच ह्या लेखालाही नाही. उत्तमातला उत्तम लेख आहे हा!!

स्वाती आंबोळे said...

अरे वा! छान लिहीता तुम्ही.
तुम्हाला भेटून आनंद झाला.

माझ्या ब्लॉगवरील अभिप्रायासाठी धन्यवाद. :)

charuta said...

खुप सुंदर! हे म्हन्जे पेन्चिल्चे एक टोक उचलले की दुसरे टोक देखील उचलले जाते यातला प्रकार!
पटले म्हणे तुझे!

Anonymous said...

Reminded me of this post by Joel the great!
http://www.joelonsoftware.com/items/2006/11/21.html

- Manish

Anonymous said...

kuhp chan.! ApratiM..!!!

****Sujeet