Sunday, November 05, 2006

चार होत्या पक्षिणी त्या

तुम्हाला असं कधी तरी होतं का? होतच असणार. कुठल्या तरी बेसावध क्षणी कुठल्या तरी निमित्तानं कुठलीतरी जुनी गोष्ट आठवते. कुठलातरी जुना प्रसंग आठवतो. कुठलंतरी जुनं गाणं आठवतं. पण माझ्यासारखी "विस्मरणशक्‍ती" अफाट असेल तर धड पूर्ण आठवत नाही, बारकावे आठवत नाहीत... आणि मग अशी चुटपुट लागून राहते.

आता कालचीच गोष्ट बघा न....

निमित्त काय झालं ते पुन्हा कधीतरी. पण मला सारखी आठवत राहिली "वीज म्हणाली धरतीला" मधली जुलेखा, "चार होत्या पक्षिणी त्या". आणि हे गाणं पूर्ण काही आठवेना. तेव्हापासून जी काही अस्वस्थ झालीये!

तेव्हा या ब्लॉगच्या वाचकांनो (वाचतंय् का हो कोणी?), कोणाकडे असेल हे गाणं पूर्ण, कृपया नोंदा न!

6 comments:

hemant said...

सुमेधा,
you are lucky. आधी खूप सर्च केले कानेटकर, विज म्हणाली धरतीला, फ़ैयाज, अगैरे वगैरे. शेवटी आम्ही म्हणतो तसे (college मध्य) प्रॉब्लेम आला की go back to fundamentals! तर लगेच फ़ोन फ़िरवला माझ्या भोपाळ आणि दिल्लीच्या मैत्रिणिंना (त्याही अजून डायरी जपून ठेवतात. तर दिल्लीच्या नीताने व भोपाळ च्या संध्याने ही मदत केली.
पूर्ण गाणे असे आहे

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

बाण आला एक कोठून, जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली, जात माझी कोकीळा

कोकीळेने काय केले, गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी, एक नाते सांधले

ती म्हणाली एकटी मी, राहीले तर राहिले
या स्वरांचे सूर झाले, यात सारे पावले

hemant said...

सुमेधा,
आता तर खात्री पटली ना की ब्लॉग अम्ही नुसताच पहात नाही तर काम सोडून (पोटापाण्याचे official,kaaraN hehee kaamach aahe) आणि जीव ओतून contribute करतोय.
You owe a treat to me when you come to surat or I come to your place (unknown!)

Sumedha said...

धन्यवाद हेमंत! तुम्ही खूपच कष्ट घेतलेत! (ब्लॉग वाचायचे आणि पूर्ण गाणे मिळवायचेही ;-)

Milind said...

अतिशय सुरेख गाणे !

ह्या गाण्याला संगीत वसंतराव देशपांडेंनी दिलय. राहुल देशपांडेच्या एका कार्यक्रमात कुणितरी फार सुरेख गायलं होतं.

- मिलिंद

bapu said...

sumedha
kahi suchat nahi
tari pan yevad suchal
diwas jalat rahnara ravi sayankali mavaltila jatana
tyachi sari jalzal mala dheun jato
ani me jalat rahto ratrabhar diwyasarkha

Sumedha said...

good lines bapu, but relevance?