Monday, February 27, 2006

स्मृति

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला प्रणाम. ही माझी खूप आवडती कविता!

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!

वार्‍यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने नि:संग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तू आर्त मला जो ऐकवलास अभंग

लावण्यवतींचा लालस येथ निवास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करूण-विलास

-कुसुमाग्रज

3 comments:

Manjiri said...

Majhi pan he khoop avadati kavita ahe. Thanks for posting it.

Actually jenva mi pahilyanda SanFranciscola kamanimitt ekati gele hote tenva mala he kavita ani khoop atavar bhidali.
mhanun ti majhi khoop ladaki ahe.

Along with Hajar jivha tujhya garju de, for the sheer proud force in it.

Sadhya marathi lekhan sahitya hatashi nasalyane ha roman lekhan khatatop.

Surendra said...

तुम्हाला या कविता अजुन पाठ आहेत? की मराठी कवितांचा संग्रह कुठे online आहे?

Sumedha said...

काही पाठ आहेत, काही वेळोवेळी वहीत टिपून ठेवलेल्या! marathiblogs.net वर बर्‍याच ब्लॉग्स् च्या नोंदींमधून काही कविता मिळतील. दुसरे स्थळ म्हणजे maayboli.com.