गाडी चालवताना माझं लक्ष बर्याच वेळा समोरच्या गाडीच्या लायसन्स् प्लेट कडे जातं. काल सकाळी signal ला थांबले असताना एक लायसन्स् प्लेट बघितली "ANIM8AR", अर्थात "animator". इथे अशा प्लेटस् बर्याच वेळा बघायला मिळतात. मला कौतुक वाटतं त्या लोकांच्या कल्पकतेचं! "YFS CAR", "DON N4C", "ML8 ML8" या अजून काही लक्षात राहीलेल्या गंमतशीर पाट्या. google वर search मारला तर कदाचित मोठी यादी मिळेल.
"ANIM8AR" बघून या पाट्यांची आठवण झाली आणि एकदम भारतातल्या ट्रकच्या मागे लिहीलेली काहीच्या काही घोषवाक्यं आठवून खूप हसू आलं. अगदी "आई-वडीलांचा आशीर्वाद", "साई-कृपा" किंवा "जय भोलेनाथ" पासून "देखो मगर प्यार से", "चल मेरी धन्नो" किंवा "जंगल की रानी" पर्यंत आणि कुटुंबनियोजनाच्या घोषणांपासून ते वनसंवर्धनाच्या ब्रीदांपर्यंत काय वाट्टेल ते. तेही लिहीणार्यांच्या कल्पकतेचं कौतुक आहे न? आणि हे सगळं "Horn OK Please" (मधोमध कमळाचं चित्र!) याच्या अवती भवती विखुरलेलं, एक एक शब्द लावून वाक्य पूर्ण करायचं म्हणजे कसरत!
हे सगळं आठवून हसू आवरेना. ऑफिसच्या दारात एरिक (सहयोगी) दिसला.
"कशाला हसतीयेस इतकं?" त्यानं विचारलं.
"देखो मगर प्यारसे" अस्मादिक!
"Oh is that 'good morning' in Indian?"
"Yes", म्हणलं जरा फिरकी घ्यावी त्याची! त्याला मग "देखो मगर प्यारसे" म्हणायला शिकवलं. म्हणलं तुला कुणी Indian मुलगी पटवायची असेल तर उपयोग होईल. पठ्ठ्याची चिकाटी पण इतकी की दिवसभर घोकत होता!
आणि आज सकाळी आल्या आल्या "देखो मगर प्यारसे सुमेधा"!! आता थोडे दिवस रोज सकाळची करमणूक होणार आहे ही :-)
Tuesday, March 14, 2006
Friday, March 10, 2006
कळत जाते तसे...
कधी कधी कारण नसताना उदास, रिकामं वाटतं ना? बाहेर ढगाळ हवा असली, किंवा संध्याकाळी कातरवेळेला उगीचच घराची आठवण आली, किंवा दिवसभराच्या कामाचा शीण विसरायला म्हणून दोन क्षण डोळे मिटून बसलं आणि डोळे उघडल्यावर सुचत नाही काही ...
अशा वेळी मला हटकून बोरकरांची ही कविता आठवते! आपले अनुभव, त्यातून येणारं (कमीत कमी येणं अपेक्षित असलेलं) शहाणपण आणि ही उदास, रिकामी जाणीव याचा खरंच काही संबंध असतो का?
कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?
कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते?
कळत जाते तसे कशा मूर्ती सार्या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?
कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात?
कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?
कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?
बा. भ. बोरकर

Monday, March 06, 2006
पाखरू
आज सकाळी खूप अस्वस्थ करणारी गोष्ट बघितली. सकाळी ऑफिसला जाताना एक चिमण्या पाखरांचा घोळका रस्त्याच्या कडेला अगदी जमिनीजवळून भरारी मारत होता. आणि माझ्या पुढच्या मोठया एस्. यू. व्ही. च्या चाकाखाली त्यातील एक पाखरू..... मला एकदम धक्का बसल्या सारखं झालं, मी कचकन् ब्रेक दाबला, अर्थात त्याचा काही उपयोग नव्हता! आणि मागच्या गाडीने जोरात हॉर्न वाजवला तो वेगळाच..
पण ते पाखरू काही दिवसभर डोक्यातून जाईना. त्याच्या घोळक्यातली पाखरं त्याला शोधत बसली असतील का? त्याला असं निपचित पडलेलं बघून चिवचिवाट करत तिथे घोटाळत राहिली असतील का? की आपल्या रोजच्या कार्यक्रमाला लागली असतील? माझ्यासारखं त्यांच्यापैकी कोणाच्या डोक्यात त्यांचा सोबती घोळत राहीला असेल का? एक न दोन.
आता थोडे दिवस तरी त्या रस्त्यावरून जाताना त्याची आठवण येत राहील...

Subscribe to:
Posts (Atom)