कामाला काही म्हणता सुर सापडत नसतो. नको असलेल्या गोष्टी पुढयात येत असतात आणि सोप्या सोप्या ठिकाणी पण घोडं अडतं. मग याहू वर "काय म्हणताय, काय चाललंय्?" असा संदेश पाठवावा! फुटकळ चकाट्या पिटायला वेळ नाही हे विसरून मस्त गप्पा टप्पा व्हाव्यात. पुढचा दिवस कसा सुरळीत जातो.
आपल्या मागे लागलेल्या लहान-मोठ्या demontors ना पळवून लावायला आपल्याच पोतडीत असतात की लहान मोठे patronus. एक इशारा पुरे असतो, जादूची कांडी सुद्धा नाही लागत.
एक मिनिट, हॅरी पॉटर न वाचणार्या पामरांनो (sigh, you don't know what you are missing!), तुम्हाला काय सांगणार कप्पाळ की dementor म्हणजे काय आणि patronus कोण! पण तुम्ही हे गाणं तर नक्कीच ऐकलं असेल न?
When the dog bites, when the bee stings, when I am feeling sad!
I simply remember my favourite things,
And then I don't feel so bad!
हे सुद्धा गाणं माहीत नाही तुम्हाला? आता मात्र हद्द झाली! मग पाडगावकर काय म्हणतात बघा
कधी कधी सगळंच कसं चुकत जातं!
नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं!
अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं!
यालाच आपली J. K. म्हणते dementor ला पळवून लावायला patronus बोलवायचा! पुढच्या वेळी तुमच्या मागे लागलाच कोणी dementor, तर सहजी बोलवून आणा तुमच्या patronus ला! आता कळलं?